बॉलिबुड अभिनेत्री कतरिना कैफ लॉकडाऊनच्या काळात सोशल मिडीयावरती चांगलीच एक्टीव आहे, कोरोना व्हायरसमुळे नागरीकांचे घराबाहेर पडणे कठीण झाले असतानाच कतरिना सोशल मिडीयावर चाहत्यांसोबतचे व्हिडीओ शेअर करत आहे. नुकताच तीने स्वतःच्या इंस्टाग्राम आकांऊटवर पोस्ट केलेला व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
कतरिनाने तीचा एक जूना व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये कतरिना खोल समुद्रामध्ये पोहताना दिसत आहे. तीच्या सोबत एक मोठा व्हेल मासा देखील पोहताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोशल मिडीयावर कतरिनाचे चाहते या व्हिडीओला चांगलीच पसंती दाखवत आहेत. वर्ल्ड ओशिएन डे च्या निमात्ताने कतरिनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. “माहासागरात एका सुंदर दिवशी, माझ्या सगळ्यात अनोख्या मित्रासोबत” अशे कॅपशन तीने व्हिडीओला दिले आहे.
कतरिनाचा शेवटचा चित्रपट हा सलमान खानसोबत आलेला भारत हा होता. लवकरत कतरिना कैफ अक्षय कुमारसोबत सुर्यवंशी हा चित्रपट दिसणार आहे. रोहित शेट्टी याने दिगदर्शीत केलेला हा चित्रपट 24 मार्च रोजी रिलीज होणार होता पण कोरोना व्हायरसमुळे तो अडकून पडला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.